आता डोअर स्टेप सर्व्हिस देणार अ‍ॅपल

अनेकदा आपला मोबाईल अथवा लॅपटॉप बिघडल्यावर सर्व्हिस सेंटरला जावे लागते. यामध्ये खूप वेळ जातो व हवी तशी सर्व्हिस देखील मिळत नाही. मात्र आता टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपलने बिघडलेल्या डिव्हाईससाठी होम सर्व्हिस देणार असल्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात, अ‍ॅपल कंपनीचे कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येऊन आयफोन, आयपॅड, लॅपटॉप अथवा मॅकबूक दुरुस्त करून देतील.

अ‍ॅपलच्या सपोर्ट पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपलचे अधिकृत इंजिनिअर्स तुमच्या घरी येऊन तुमचे डिव्हाईस रिपेअर करेल. जर तुम्हाला अ‍ॅपलच्या एखाद्या प्रोडक्टविषयी तक्रार असेल तर तुम्ही अ‍ॅपलच्या सपोर्ट पेजवर जाऊन प्रोडक्ट निवडू शकता व आपली तक्रार मांडू शकता.

अ‍ॅपलची ही नवीन सेवा सध्या शिकागो, डालास, हॉस्टन, लॉस एंजिलेस आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथेच उपलब्ध आहे. लवकरच इतर देशांमध्ये देखील ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment