एकाच वेळी होणार निर्भयाच्या चारही दोषींना फाशी


नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्यात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पटियाला हाऊस कोर्टाचा चारही आरोपींच्या डेथ वॉरंटवर स्थगिती आणणारा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. एकाच वेळी सर्व आरोपींना फाशी देण्यात येईल असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

पटियाला हाऊस न्यायालयाने चार आरोपींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. तिहार तुरुंग आणि केंद्र सरकारने या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असता तरच फाशीची शिक्षा थांबवण्यात येते, असे न्यायालयाने म्हटल्यामुळे चारही आरोपींना आता एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे.

Leave a Comment