लेझर लाईटमध्ये झळाळला स्टॅच्यु ऑफ युनिटी


फोटो सौजन्य पत्रिका
गुजराथच्या कवेडीया मध्ये उभारण्यात आलेली जगातील सर्वात उंच प्रतिमा स्टॅच्यु ऑफ युनिटी सोमवारी लेझर लाईटच्या प्रकाशात झळाळली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या या पुतळ्यावर लेझर शोची सुरवात झाली आणि सरदारांच्या हृदयस्थळावर एका शाळेतील मुलीची प्रतिमा आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश झळकुन उठला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणातील पानिपत येथे या अभियानाची सुरवात केली होती. लैंगिक भेदभाव कमी व्हावा आणि महिला सशक्तीकरण मोहिमेला प्रोत्साहन मिळावे असा त्यामागचा उद्देश असून महिला बाल विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच मानव संसाधन मंत्रालयांतर्फे ही योजना राबविली जात आहे.

गुजराथ मध्ये नर्मदे काठी सरदार सरोवरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यु ऑफ युनिटी उभारला गेला असून सध्या तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा ७ किमी अंतरावरून दिसतो. त्याचे वजन १७०० टन असून महाराष्ट्रातील शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तो बनविला गेला आहे. त्यासाठी भारतीय मजुरांबरोबर २०० चीनी मजूर काम करत होते. या पुतळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च आला आहे.

Leave a Comment