फेसबुक सीओओ शेरील झाली एंगेज


फोटो सौजन्य न्यूज १८
फेसबुकची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्गने तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करताना एक सुंदर कृष्णधवल फोटो शेअर केला असून त्याखाली एक गोड पोस्ट लिहिली आहे. फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर हा फोटो तिने शेअर केला आहे. त्याखाली शेरील लिहिते, एंगेज्ड, टॉम बर्थनल, तूच माझे सर्वस्व आहेस. यापेक्षा अधिक प्रेम मी करू शकत नाही.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने शेरीलच्या पोस्टवर कॉमेंट करताना एकदुसऱ्यांना तुम्ही अगदी अनुरूप आहात, मला खूप आनंद होतोय असे म्हटले आहे. शेरील ५० वर्षांची असून तिच्या पतीचे २०११ मध्ये अचानक निधन झाले होते. शेरीलचा पती डेव्हिड गोल्डबर्ग ट्रेडमिलवरून पडून अचानक मरण पावला होता. त्यानंतर शेरील एकदमच चर्चेत आली होती. शेरीलचा नवा जोडीदार टॉम ४६ वर्षांचा आहे आणि लॉस एंजेलिस मधील स्ट्रॅटेजिक फर्म केल्टन ग्लोबलचा संस्थापक आणि सीईओ आहे.

Leave a Comment