इंडोनेशियात सुरु झाले पहिले हिंदू विश्वविद्यालय सुग्रीव


फोटो सौजन्य पत्रिका
मुस्लीमबहुल असलेल्या इंडोनेशियात पहिले हिंदू विश्वविद्यापीठ सुरु झाले असून या विद्यापीठाचे नामकरण सुग्रीव असे केले गेले आहे. इंदोनिशियाच्या बाली राज्यात डेनपसार येथे या विश्वविद्यापीठाचे उद्घाटन इंडोनिशियाचे राष्ट्रपती जोको विदोडो जोकोवि यांनी केले. त्यांनी प्रेसिडेन्शियल रेग्युलेशन अंतर्गत हिंदू धर्म स्टेट इन्स्टिट्यूट (IHDN) ला देशाचे पहिले हिंदू विद्यापीठ बनविले आहे.

या नवीन विद्यापीठाचे नाव आयगुस्ती बागास सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी असे असेल असे जाहीर केले गेले आहे. १९९३ मध्ये हिंदू धर्म अध्यापन करण्यासाठी स्टेट अकादमीच्या धर्तीवर ही संस्था सुरु झाली होती. १९९९ मध्ये त्याचे हिंदू रिलीजन स्टेट कॉलेज मध्ये परिवर्तन झाले आणि २००४ मध्ये ते आयएचडीएन मध्ये बदलले गेले होते.

गेल्या शुक्रवारी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर संस्थेचे नवे स्टेट्स जाहीर केले गेले आहे. इंडोनेशिया हा मुस्लीमबहूल देश असला तरी येथे हिंदू धर्म आदराचा विषय आहे. रामायण काळापासून हा देश भारताला जवळचा आहे. रामायणातही इंडोनेशियातील अनेक ठिकाणांचा उल्लेख आलेला आहे. बाली बेटावर आजही हिंदू मान्यतेप्रमाणे मंदिरातून पूजा अर्चा केली जाते आणि येथे हिंदू धर्माचे अभ्यासक मोठ्या प्रमाणावर आहेत.

Leave a Comment