जागतिक कर्करोग दिन : या 4 गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर

जगभरात प्रत्येकी 8व्या व्यक्तीला कॅन्सरमुळे प्राण गमवावे लागत आहेत. जर सुरुवातीच्या टप्प्यात यावर उपचार करण्यात आले नाहीत, तर हा आजार जीवघेणा ठरतो. अमेरिकेत 20 टक्के लोक वजन वाढणे, फिजिकल इनेक्टिव्हिटी, खराब न्यूट्रिशन आणि दारूमुळे कॅन्सरने ग्रस्त आहेत. म्हणजेच मनुष्याच्या आहाराचा कॅन्सरशी थेट संबंध आहे.

एका रिपोर्टनुसार, योग्य आहारामुळे कॅन्सरचा धोका टाळता येतो. मात्र आपल्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश असल्याने कोणत्या वस्तूमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हे सांगणे अवघड आहे.

वर्ष 2018 मध्ये 1 लाख लोकांवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने लोकांना कॅन्सर होत आहे. 10 टक्के लोक केवळ अशा फूडमुळे कॅन्सरचे शिकार होत आहे.

Image Credited – Food Navigator

जीवघेणे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड –

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये पॉकेटमध्ये येणारे ब्रेड, मिठाई, स्नॅक्स, सोडा, शुगर ड्रिंग्स, बंद पॉकिटमध्ये येणारे प्रोसेस्ड मीट (मटन) यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. याशिवाय साखर, तेल आणि चरबीचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांमुळे देखील कॅन्सरचा धोका वाढतो.

काय आहे प्रोसेस्ड मीट ?

प्रोसेस्ड मीट अर्थात असे मटन जे अधिक दिवस ताजे राहण्यासाठी रसायन, प्रिजरव्हेटिव्हसोबत मिसळून ठेवले जाते. सॉस, हॅम, बेकन, हॉट डॉग आणि पॅकेज्ड मीटसारखे खाद्य पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.

रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट –

एका संशोधनानुसार, वारंवार प्रोसेस्ड मटन खाल्ल्याने ब्लॅडर कॅन्सरचा धोका वाढतो. तर नॉन प्रोसेस्ड रेड मीट खाल्ल्याने कॅन्सरचा धोका निर्माण होत नाही. अमेरिकन इंस्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चनुसार, वारंवार प्रोसेस्ड मटन खाल्ल्याने पोट अथवा कॉलेस्ट्रॉल कॅन्सर होऊ शकतो.

Image Credited – healthline

दारूमुळे कॅन्सरचा धोका –

संशोधकांचा दावा आहे की, अधिक दारूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका असतो. दारू अथवा मादक पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्याचा कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलेरेक्टम कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.

तंबाखू आणि धुम्रपान –

अमेरिकन इंस्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चनुसार, दारू व्यतरिक्त सिरगेट अथवा तंबाखूच्या सेवनामुळे देखील कॅन्सरचा धोका वाढतो. दारू व अन्य पदार्थांमध्ये अशा केमिकलचा समावेश असतो, जे मनुष्याच्या डीएनएला नुकसान पोहचवते.

Image Credited – theconversation

लठ्ठपणा कॅन्सरचे कारण –

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डायबेटिज अँड डायजेस्टिव अँड किडनी डिसीजनुसार, अमेरिकेतील 2/3 लोकांमध्ये लठ्ठपणामुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे. अधिक वजन असल्याने लोकांना टाइप-2 मधुमेह, ह्रदय रोग आणि अनेक प्रकारचे कॅन्सर होत आहे.

लठ्ठपणामुळे होणारे कॅन्सर –

लठ्ठपणामुळे लोकांना ब्रेस्ट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, एंडोमेटेरियल कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, किडनी कॅन्सर, प्रँक्रियाज कॅन्सर, सेर्विक्स कॅन्सर आणि ओवेरी कॅन्सर होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment