उदयनराजे भोसले होणार राज्यसभा खासदार?


सातारा – विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातात कमळ घेत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत उदयनराजे यांचा पराभव झाला. पण आता येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण 19 जागांपैकी 7 खासदार हे निवृत्त होणार आहेत. त्यात उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर निवड होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेचे एकूण 19 खासदार आहेत. 2 एप्रिल 2020 ला त्यापैकी 7 खासदारपदे रिक्त होणार असल्यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची तयारी भाजपने केल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रात त्यांना मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

उदयनराजेंना अमर साबळे यांच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. परंतु, भाजपची राजकीय ताकद महाराष्ट्रात वाढवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना उदयनराजेंचे हात बळकट करण्याची गरज वाटत आहे. त्याचबरोबर युवा वर्ग व मराठा मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उदयनराजेंना खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment