विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम करणार न्यूझीलंडचे नेतृत्व


नवी दिल्ली – भारताविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांतून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन संघाबाहेर पडला आहे. टॉम लॅथम त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने (एनझेडसी) दिली आहे.

मार्क चॅपमनला पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विल्यमसनच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. डाव्या खांद्याच्या दुखापतीतून विल्यमसन सावरत आहे. ही दुखापत गंभीर नसल्याचे एक्स-रे स्कॅनवरून असे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या भारताविरुद्धच्या टी-२० दरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. त्याच्या अनुपस्थितीत टिम साऊदीने न्यूझीलंडचे नेतृत्व केले होते.

तो आठवडाभर तंदुरुस्तीचे प्रशिक्षण सत्र चालू ठेवेल आणि त्यानंतर, तो खेळण्यास सुरुवात करेल, असे टीम फिजिओ विजय वल्लभ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ फेब्रुवारीला बुधवारी पहिला एकदिवसीय सामन्यात सामना होईल.

Leave a Comment