9 कोटी कमवणारा करायचा ‘सँडविच’ चोरी, गमावली नोकरी

कोट्यावधी रुपये कमवणारी व्यक्ती एखादी 100-200 रुपयांची गोष्ट चोरी करु शकते का ? या प्रश्नावर तुमचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. कारण कोट्यावधी रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट चोरी करण्याची गरजच पडणार नाही. मात्र लंडनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला सँडविच चोरी केल्यामुळे कामावरुन काढून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे.

लंडनमध्ये राहणारा 31 वर्षीय पारस शाह एक मिलेनियर ट्रेडर आहे. पारस लंडनमधील सिटीग्रुपसोबत काम करतो. ही कंपनी मिडल ईस्ट, अफ्रिका आणि यूरोपमध्ये ट्रेड करण्याचे काम करते. येथे काम करण्याआधी त्याने एचएसबीसीमध्ये देखील काम केले होते.

सांगण्यात येत आहे की तो ऑफिसच्या कँटिनमधून सँडविच चोरी करुन खात असे. या कारणामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

त्याचे वार्षिक पॅकेज 1 मिलियन यूरो होते. तसेच बोनस वेगळा. पारसची पत्नी नॉर्थ लंडनमधील एका ज्वेलरी कंपनीत काम करते. मात्र अद्याप पारस अथवा सिटीग्रुपकडून यावर अधिकृतरित्या काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment