असा आहे न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ


नवी दिल्ली – न्यूझीलंडला टी-२० मालिकेत पराभूत केल्यानंतर, आता एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाला आहे. बीसीसीआयने नुकतीच आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. तत्पूर्वी, दुखापतीमुळे भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

रोहित शर्माच्या जागी कसोटी संघात मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात खेळत असताना दुखावले गेल्यामुळे अर्ध्यातच त्याला मैदान सोडावे लागले होते. दरम्यान रोहितची दुखापत गंभीर असल्याने, तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.


कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृध्दिमान साहा (यष्टिरक्षक), रिषभ पंत. रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा.

Leave a Comment