एकेकाळचा ट्रक ड्रायव्हर आज आहे या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

तुम्ही जर न थांबता योग्य दिशेने मेहनत करत राहिला तर एकेदिवशी तुमचे नशीब नक्की बदलते. असेच काहीसे न्यूझीलंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल म्हणावे लागेल.

ग्रीम हार्ट हे आज न्यूझीलंडमधील सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत. मात्र ते एकेकाळी गाडीचे पार्ट्स दुरुस्त करणे आणि ट्रक ड्रायव्हरचे काम करत असे. ग्रीम हाय-स्कूल ड्रॉप आउट देखील आहेत.

ग्रीम हार्ट यांनी खाजगी इक्विटीद्वारे एवढी संपत्ती कमवली की ते आज न्यूझीलंडमधील सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत. त्यांची मोठ्या ट्रॅश बॅग्स आणि एल्युमिनियम ऑईलचे उत्पादन करणारी कंपनी रेनॉल्डस कंझ्यूमर प्रोडक्ट्स इंक मागील आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली होती. कंपनीचे शेअर्स 9.8 टक्क्यांनी वाढून 28.55 डॉलर्सला बंद झाले. त्यानंतर ग्रीम यांची कंपनीमधील भागिदारी 4.4 बिलियन डॉलर एवढी झाली. सोमवारी देखील कंपनीच्या शेअर्समध्ये 3.7 टक्क्यांनी वाढ पाहण्यास मिळाली.

64 वर्षीय ग्रीम यांची रेनॉल्ड्स कंपनीत मोठी हिस्सेदारी आहे. यासोबतच ऑकलँड येथील खाजगी इक्विटी कंपनी आणि कंझ्यूमर-गुड्सचा उद्योग त्यांची मोठी संपत्ती आहे. 2010 मध्ये रँक ग्रुपद्वारे रेनोल्ड्स कंपनीची सुरूवात करण्यात आली होती.

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत येणारे ग्रीम आपल्या खर्चासाठी देखील ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेक सुपर-यॉट्स आहेत. यामध्ये 116 मीटर यूलिसस यॉटचा देखील समावेश आहे. जवळपास 200 मिलियन डॉलर्सच्या या जहाजेवर हेलिपॅड ठेवण्यास देखील जागा आहे.

ग्रीम यांनी खूप कमी वयातच शाळा सोडून गाडीचे पार्ट्स दुरुस्त करणे आणि ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी यूनिवर्सिटी ऑफ ओटागो येथून एमबीए केले.

Leave a Comment