स्कोडाने सादर केली ‘व्हिजन इन’ कॉन्सेप्ट एसयूव्ही

स्कोडाने आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही ‘व्हिजन इन’ला ऑटो एक्स्पो 2020 च्या आधी सादर केले आहे. MQB A0-IN या प्लॅटफॉर्म अंतर्गत ही कार तयार करण्यात आलेली आहे. या मॉडेलवर आधारित एसयूव्हीला कंपनी 2021 मध्ये बाजारात लाँच करेल.

कारमध्ये 1.5 लीटर टीएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. जे 150 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या या इंजिनमध्ये 7 स्पीड डीएसजी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार केवळ 8.7 सेंकदामध्ये ताशी 0 ते 100 किमी वेग पकडते. या गाडीची टॉप स्पीड ताशी 195 किमी आहे.

Image Credited – hindustantimes

स्कोडा व्हिजन इन 4,256 एमएम लांब आणि व्हिलबेस 2,671 एमएम आहेत. एसयूव्हीमध्ये पातळ हेडलॅम्प्स आणि आकर्षक ग्रिलसोबत 19 इंचाचे एलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. कारमध्ये एलईडी हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्प्ससोबत क्रिस्टलाइन एलिमेंट देखील मिळेल.

Image Credited – carscoops

भारतीय लूक देण्यासाठी या कारच्या कॅबिनला पारंपारिक लूक देण्यात आलेला आहे. सीट अपहोस्ट्री पाइनाटेक्सची आहे. जे अननसाच्या पानांच्या कचऱ्यापासून बनलेले असते. यासोबतच कारमध्ये नैसर्गिक लेदर आणि रिसायकल्ड प्लास्टिक फायबर्सचा वापर करण्यात आलेला आहे.

Image Credited – skoda

एसयूव्हीमध्ये 12.3 इंच फ्री स्टँड डिस्प्लेसोबत कस्टमाइजेबल व्हर्च्युअल कॉकपिट आणि क्रिस्टलाइन गिअर लिव्हेर मिळेल. एसयूव्हीच्या मध्यभागी असलेल्या सेंट्रल कंसोल द्वारे तीन सीट्सच्या रांगेला दोनमध्ये देखील बदलता येते.

Leave a Comment