सॅमसंगने लाँच केला स्वस्त ‘गॅलेक्सी ए01’ स्मार्टफोन

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए सीरिजमधील नवीन स्मार्टफोन ‘गॅलेक्सी ए01’ ला व्हिएतनाममध्ये लाँच केले आहे. युजर्सला या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा सपोर्ट मिळेल. भारतात गॅलेक्सी ए01 कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने या फोनची किंमत 2 2,790,000 डाँग (जवळपास 8,550 रुपये) ठेवली आहे.

Image Credited – Hamariweb

या फोनमध्ये 5.7 इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. सोबतच चांगल्या परफॉर्मंससाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 एओसी प्रोसेसर मिळेल. कंपनीने यात 2 जीबी रॅम + 16 जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Image Credited – Youtube

गॅलेक्सी ए01 मध्ये कंपनीने ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे. ज्यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल सेंसर कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर फ्रंटला 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी पोर्टसारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आलेले आहेत. या फोनमध्ये 3000 एमएएच बॅटरी मिळेल.

Leave a Comment