स्मार्टफोनमधील फोटो डिलीट झाले असल्यास असे मिळवा परत

अनेकदा आपण स्टोरेजमुळे फोनमधील अनावश्यक फोटो डिलीट करत असतो. मात्र अचानक कधीतरी त्या फोटोंची गरज पडत असते. आज अशाच काही ट्रिक्स जाणून घेऊया ज्याद्वारे तुम्ही तुमचे डिलीट केलेले फोटो परत मिळवू शकाल.

Image Credited – Amarujala

गुगल फोटोजद्वारे डिलीट झालेले फोटो –

सर्व अँड्राईड फोनमध्ये गुगलचे फोटोज अ‍ॅप असते. गुगल फोटोजमध्ये फोटो बॅकअपचा देखील पर्याय असतो. याच्या मदतीने तुम्ही गुगल ड्राइव्हवर फोटो बॅकअप मिळवू शकता. जर गुगल फोटोजमधून फोटो डिलीट झाले असतील तर काळजी करण्याचे कारण नाही. हे अ‍ॅप उघडल्यानंतर तुम्हाला Trash अथवा Bin हा पर्याय दिसेल. तेथे तुम्हाला सर्व डिलीट केलेले फोटो मिळतील. 60 दिवसांपुर्वी डिलीट केलेले फोटो मात्र मिळणार नाहीत.

Image Credited – Amarujala

मेमरी कार्डद्वारे डिलीट झालेले फोटो –

जर तुम्ही मेमरी कार्डमधील फोटो डिलीट केले असतील तर मेमरी कार्ड एखाद्या कार्ड रीडरच्या मदतीने कॉम्प्युटरला जोडावे. त्यानंतर कोणत्याही रिकवरी सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही फोटो परत मिळवू शकाल. फोटो परत मिळवण्यासाठी तुम्ही कॉम्प्युटरमध्ये EaseUS Data Recovery Wizard डाऊनलोड करु शकता.

Image Credited – Amarujala

अँड्राईड फोनमधून डिलीट झालेले फोटो –

अँड्राईड फोनमधून डिलीट झालेले फोटो मिळवण्यासाठी तुम्ही DiskDigger अ‍ॅप वापरू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही डिलीट केलेले फोटो देखील परत मिळवू शकता. जर फोटो व व्हिडीओ व्यतरिक्त इतर गोष्टी परत मिळवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

Leave a Comment