भारतीय डावाची सुरुवात करणार पृथ्वी शॉ-मयांक अग्रवाल !


हॅमिल्टन: मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. याच बरोबर संघात दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल यांची निवड करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीने संघाच्या निवडीनंतर एक मोठी घोषणा केली.

पृथ्वी शॉ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सलामीवीर म्हणून उतरेल. तर मधळ्या फळीतील जबाबदारी शानदार फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल हा पार पाडले. एवढेच नव्हे तर विकेटकीपर म्हणून राहुलच असेल. एकदिवसीय मालिकेआधी पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, रोहितचे संघात नसने हे नक्कीच चांगली गोष्ट नाही. पण आता पृथ्वी शॉ डावाची सुरूवात करेल आणि राहुल मधळ्या फळीत खेळेल तसेच तो यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडेल.

रोहितच्या जागी संघात मयांकचा समावेश करण्यात आल्यामुळे आता पृथ्वी आणि मयांक ही भारताची नवी सलामीची जोडी असेल. भारताने टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवला आहे. आता वनडे आणि कसोटी मालिका होणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी पृथ्वीचा देखील संघात समावेश करण्यात आला. रोहित जखमी झाल्यामुळे एकदिवसीय आणि कसोटी संघातून बाहेर पडला. यामुळे पृथ्वीला संधी मिळाली. अर्थात रोहितच्या जागी संघात मयांकला घेण्यात आले आहे. कसोटी संघात जलद गोलंदाज इशांत शर्माला देखील संधी मिळाली आहे. पण मालिकेआधी तो किती फिट आहे त्यावर त्यांची निवड होईल. कसोटीत नवदीप सैनीला देखील संधी मिळाली आहे.

Leave a Comment