6 कॅमेऱ्यासह बहुप्रतिक्षित ‘पोको एक्स2’ लाँच

शाओमीपासून वेगळे झाल्यानंतर पोको कंपनीने भारतात आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन पोको एक्स2 (Poco X2) लाँच केला आहे. पोको एक्स2 चे सुरुवाती व्हेरिएंट 6 जीबी+64जीबी स्टोरेजची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन अटलांटिस ब्लू, मीट्रिक्स पर्पल आणि फिनिक्स रेड या 3 रंगात उपलब्ध आहे. या फोनमध्ये फ्रंटला 2 आणि रिअरला 4 असे एकूण 6 कॅमेरे आहेत.

कंपनीने हा स्मार्टफोन 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. यातील 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची 16,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. 11 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल.

Image Credited – FoneArena

पोको एक्स2 मध्ये 6.67 इंच डिस्प्ले मिळेल. ज्याचा ऑस्पेक्ट रेशिओ रेट 120Hz आहे. हायर रिफ्रेश रेटमुळे युजर्सला चांगला गेमिंग अनुभव मिळेल. या स्मार्टफोनमध्ये Adreno 618 GPU सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये लिक्विडकूल टेक्नोलॉजी देण्यात आलेली आहे. पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये 27W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. कंपनीचा दावा आहे की केवळ 68 मिनिटात फोन 0 ते 100 टक्के चार्ज होईल.

Image Credited – XDA Developers

पोको एक्स2 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात एकूण 6 कॅमेरे देण्यात आलेले आहेत. फोनच्या बॅकला Sony IMX686 चा 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा देण्यात आलेला आहे. यासोबतच रिअरला 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यात एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅकचा समावेश आहे. फोन हाय-रेंज ऑडिओ सपोर्ट आहे.

Leave a Comment