या नवाबाच्या शस्त्रगारात सापडली सोने-चांदी जडित शस्त्र

उत्तर प्रदेशमधील रामपूरचे शेवटचे शासक नवाब रजा अली खां यांच्या संपत्तीचे वाटप करण्याच्या प्रक्रियेंतर्गत जुने शस्त्रागार उघडण्यात आले तेव्हा सगळ्यांनाच आश्यर्याचा धक्का बसला. शस्त्रागारात सोने आणि चांदी जडित शस्त्रास्त्र सापडली आहेत. पहिल्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले नसून, अजून दोन दिवस हे काम सुरु राहणार आहे.

जिल्हा न्यायालयाने हे शस्त्रागार उघडण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार सिंह यांनी यासाठी एसडीएम पुंडीर, सीओ विद्या शुक्ल आणि शस्त्रांची माहिती असलेले राशिद खां आणि आमिर खां यांना कमेटीमध्ये शामिल केले होते.

Image Credited – Aajtak

वकिल कमिश्नर मुजम्मिल हुसैन व सौरभ सक्सेना यांनी कमेटीच्या उपस्थितीमध्ये शस्त्रागाराचे टाळे उघडले. येथे नवाब घराण्याचे सदस्य देखील होते. शस्त्रागार उघडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण यात पेटी आणि कपाटात मौल्यवान शस्त्रसाठा होता. यातील काही शस्त्रांवर सोने आणि चांदी देखील लावण्यात आलेली होती.

Image Credited – Aajtak

पहिल्या दिवशी सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने अजून दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी 400 शस्त्रास्त्र मिळाले. ज्यात तलवारी, खंजीर, भाले, पिस्तूल, बंदूक, रायफल आणि अन्य शस्त्र सापडले. या शस्त्रांची संख्या हजारोमध्ये आहे.

शस्त्रागारात जे शस्त्र सापडले त्यात लंडन, हॉलंड, जर्मनी, अमेरिका, स्पेन आणि जापान सारख्या देशातील कंपन्यांनी बनवलेल्या शस्त्रांचा देखील समावेश आहे.

Leave a Comment