या रहस्यमयी ग्रहावर असतो सलग 42 वर्ष दिवस आणि 42 वर्ष रात्र

सुर्यापासून सातवा ग्रह हा हर्षल अर्थात यूरेनस आहे. या ग्रहाला गॅस राक्षस देखील म्हटले जाते. कारण येथे माती-दगडांच्या जागी अधिकतर गॅस आहे. हा सौरमंडळातील पहिला असा ग्रह आहे, ज्याला टेलिस्कोपच्या मदतीने शोधले होते. या ग्रहाविषयी काही रोचक गोष्टी जाणून घेऊया.

यूरेनस ग्रह आपल्या अंक्षावर 17 तासात एक फेरी पुर्ण करतो. याचा अर्थ यूरेनसवर एक दिवस केवळ 17 तासांचा असतो. येथील एक वर्ष पृथ्वीच्या 84 वर्षांऐवढे आहे. या ग्रहावर सलग 42 वर्ष रात्र आणि 42 वर्ष दिवस असतो. याचे कारण म्हणजे या ग्रहाचा ध्रुव पोल सलग 42 वर्ष सुर्याच्या समोर आणि दुसरा पोल अंधारात असतो.

Image Credited – Amarujala

यूरेनस ग्रह सुर्यापासून जवळपास 3 अब्ज किमी लांब आहे. याच कारणामुळे हा ग्रह खूप थंड आहे. येथील सरासरी तापमान -197 डिग्री सेल्सियस असते. वैज्ञानिकांनुसार, या ग्रहाचे न्यूनतम तापमान -224 डिग्री सेल्सियस असल्याचे आढळून आले आहे. जेथे पृथ्वीला एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे. तेथे यूरनेसला 27 नैसर्गिक उपग्रह आहेत. मात्र यातील अधिकतर उपग्रह खूपच छोटे आणि अंसतुलित आहेत.

Image Credited – Amarujala

हा ग्रह आपल्या अंशावर 98 डिग्री झुकलेला आहे. यामुळे येथील हवामान खूपच असामान्य असते. येथे नेहमी वादळासारखी स्थिती निर्माण होते. येथे हवा ताशी 900 किमी वेगाने देखील वाहते.

Image Credited – Amarujala

येथे मिथेन गॅसचे प्रमाण अधिक आहे. सोबतच येथे बर्फ आणि दगड देखील आढळतात. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, येथील मिथेन गॅसच्या प्रमाणामुळे हिऱ्यांचा पाऊस होतो.

सुर्यापासून हा ग्रह लांब असल्याने सुर्याची किरणे येथे पोहचण्यासाठी 2 तास 40 मिनिटे लागतात. हा वेळ पृथ्वीवर सुर्याची किरणे पोहचतात त्यापेक्षा 20 पट अधिक आहे. पृथ्वीवर सुर्याची किरणे पोहचण्यासाठी सर्वसाधारणपणे 8 मिनिटे 17 तास लागतात.

Leave a Comment