ही आहेत भारताच्या भात्यातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रे

भारताने मागील काही वर्षांमध्ये आपल्या क्षेपणास्त्र साठ्यात मोठी वाढ केली आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय सैन्य दल देखील सतर्क आहे. पाकिस्तानने काही दिवसांपुर्वीच गजनवी क्षेपणास्त्राचे परिक्षण केले. मात्र आजही पाकिस्तान भारताच्या क्षेपणास्त्र क्षमतेसमोर काहीच नाही. भारताकडे अनेक जागतिक दर्जाची क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्र आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

अग्नि 5-

हे अग्नि सीरिजमधील इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत. याची रेंज 5500 किमी असण्यासोबतच हे अनेक गोष्टीत जागतिक दर्जाचे क्षेपणास्त्र आहे. वेळ आल्यावर याची मारा करण्याची क्षमता देखील वाढवता येईल.

Image Credited – Amarujala

अग्नि 4 –

आपल्या जुन्या व्हर्जनच्या तुलनेत अग्नि 4 क्षेपणास्त्र खूपच हलके आहे. यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, या क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता 4000 किमी आहे.

Image Credited – Amarujala

अग्नि 3 –

अग्नि 3 क्षेपणास्त्राची लांबी 17 मीटर आणि व्यास 2 मीटर आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याच्या क्षमता असलेल्या हे क्षेपणास्त्र 3500 किमीपर्यंत मारा करु शकते. यात दीड टनापर्यंत पेलोड (शस्त्र) घेऊन जाण्याची क्षमता आहे. यात अत्याधुनिक कॉम्प्युटर आणि नेव्हिगेशन प्रणाली आहे.

Image Credited – Amarujala

अग्नि 2 –

अग्नि 2 क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे 1 टन पेलोड घेऊन जाण्यासोबतच 2 हजार किमीपर्यंत मारा करु शकते. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि तंत्रज्ञान आहे.

Image Credited – Amarujala

अग्नि 1 –

अग्नि 1 क्षेपणास्त्राच्या निर्मितीची सुरुवात 1999 मध्ये झाली होती. याची पहिले परिक्षण 2002 मध्ये करण्यात आले. अग्नि 1 क्षेपणास्त्र 700 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.

Image Credited – Amarujala

निर्भय –

हे भारताचे सबसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. निर्भय क्षेपणास्त्रात रॉकेट मोटार बूस्टरसह टर्बोफेन इंजिन आहे. यामुळे याची रेंज 800 ते 1000 किमी आहे. कोणत्याही हवामानात या क्षेपणास्त्राद्वारे अचूक निशाणा साधता येतो.

Image Credited – Amarujala

प्रहार –

प्रहार शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ज्याची मारक क्षमता 150 किमीपर्यंत आहे. पुढील काही वर्षात हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्यात सामिल होण्याची शक्यता आहे.

Image Credited – Amarujala

नाग –

4 किमी रेंजसोबत 42 किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र आपल्या सोबत 8 किलो विस्फोटक घेऊन जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र फायर अँड फॉरगेटच्या आधारावर काम करते. हे क्षेपणास्त्राद्वारे जमिनीवरुन जमिनीवर आणि हवेतून जमिनीवर मारा करता येतो.

Image Credited – Amarujala

ब्रह्मोस –

या क्षेपणास्त्रला भारत आणि रशियाने मिळून बनवले आहे. हे जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. याची मारा करण्याची क्षमता 290 किमी आहे आणि गती ताशी 3700 किमी आहे. याचे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाच्या मस्कन्वा नदीवरुन ठेवण्यात आलेले आहे.

Image Credited – Amarujala

आकाश –

700 किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन हवेत मारा करण्यास सक्षम आहे. याची गती 2.7 मॅक असून, याची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे 25 किमीच्या रेंजमध्ये कोणत्याही उडणाऱ्या गोष्टीला भेदण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राला भारताचे पॅट्रियॉट म्हटले जाते.

 

Leave a Comment