बाबासाहेबांनी ‘हिंदू मॅरेज कोड’चा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते ?


पुणे – पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्‍‍मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यावेळी बोलताना विक्रम गोखले यांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केलं पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. ‘हिंदू मॅरेज कोड’चा आग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी रोज पूजन केले पाहिजे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या ऋणात धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम राहिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीला समाजपुरुष मानणे हा आपला सामाजिक दोष आहे. आपण एखाद्याला देवत्व देऊन धन्य होतो. पण, ती देखील माणसेच आहेत. ते देखील चुकू शकतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कायम स्मरण ठेवले पाहिजे, असे यावेळी विक्रम गोखले यांनी सांगितले.

Leave a Comment