सूरज पांचोलीच्या आगामी ‘हवा सिंह’चा फर्स्टलूक रिलीज


बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचे वारे वाहत असून आतापर्यंत अनेक बायोपिक आपल्या भेटीला येऊन गेले आणि त्या बायोपिकवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम देखील केले.


त्यातच आता एका बायोपिकसाठी अभिनेता सूरज पांचोली देखील सज्ज झाला आहे. बॉक्सिंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव ‘हवा सिंग’ यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे. नुकताच या बायोपिकचा फर्स्टलूक रिलीज करण्यात आला आहे.

‘हवा सिंह’च्या बायोपिकचे पहिले पोस्टर सलमान खाननेही सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याने याला ‘हवा से बाते करेंगे सिंह’, असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टरमध्ये सूरज पांचोलीचा दमदार लुक पाहायला मिळतो.

Leave a Comment