या ठिकाणी तयार होत आहे जगातील सर्वात मोठी रहिवासी कॉलोनी

इजिप्तची राजधानी कोहिराजवळ जगातील सर्वात मोठी रहिवासी कॉलोनी उभारण्यात येणार आहे. येथील 13,500 अपार्टमेंट्समध्ये तब्बल 30 हजार लोक राहू शकतील. ही कॉलोनीबनविण्यासाठी 3 हजार 873 कोटी रुपये (420 मिलियन पाउंड्स) खर्च येईल. या कॉलोनीमध्ये शॉपिंग मॉल, थेअटर आणि अन्य लग्झरी सुविधा असतील.

या कॉलोनीचे डिझाईन जॉर्डियन अमेरिकन रिअल एस्टेट डेव्हलपर आणि डिझाईनर मोहम्मद हदीद डिझाईन करत आहेत. या कॉलनीला फ्लॅट्स ऑफ ब्लॉक असे नाव देण्यात आलेले आहे. याला बनविणाऱ्यांनी यामागील कारण सांगितले की, कोहिराची लोकसंख्या 210 लाख आहे व पुढील एका वर्षात ही संख्या 5 लाखांनी वाढेल. ही जगातील सर्वात मोठी रहिवासी कॉलोनी असेल व याचे काम 2025 पर्यंत पुर्ण होईल.

या कॉलोनीच्या फ्लॅट्सची किंमत 35 लाख ते 87 लाख रुपये असेल. येथे राहणाऱ्यांसाठी 40 एकरचे गार्डन, सायकलिंग ट्रॅक आणि स्विमिंग पूल देखील असेल. सोबतच फिटनेस सेंटर, रॉक क्लायबिंग वॉल आणि हॉटेल देखील असेल.

ही इमारत 11 मजली असेल व  6 लाख 50 हजार वर्ग फूट भागात पसरलेली असेल. 4 हजार वर्षांपुर्वी बनवलेल्या फ्लोर एरिया गीजाच्या चेओप्स पिरामिडपेक्षा हे 4 पट अधिक मोठे असेल.

Leave a Comment