जागतिक कर्करोग दिन : बॉलिवूडच्या या कलाकारांनी देखील केली आहे कॅन्सरवर मात

दरवर्षी कॅन्सरविषयी जागृकता पसरवण्यासाठी 4 फेब्रुवारीला जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कॅन्सर सारख्या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. हा आजार कोणाला होईल सांगता येत नाही. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या भयंकर आजारावर मात केली आहे. अनेक कलाकारांना या आजारावर मात करत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. या कलाकारांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

लीसा रे-

बॉलिवूड अभिनेत्री लीसा रे ने वर्ष 2001 मध्ये कसूर चित्रपटाद्वारे सुरुवात केली होती. मात्र 2009 मध्ये तिला मल्टीपल माइलोमा नावाचा कॅन्सर असल्याचे आढळले. हा एक दुर्मिळ कॅन्सर असून, खूप कमी लोकांना होतो. वर्ष 2010 मध्ये तिने स्टेम सेल ट्रांप्लांट करुन या आजारावर मात केली.

Image Credited – India TV

सोनाली बेंद्रे –

सोनाली बेंद्रेला 2019 मध्ये हाय ग्रेड कॅन्सर असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. सोनालीने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. तिने न्यूयॉर्कमध्ये यावर उपचार घेतले व कॅन्सरवर मात करत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

Image Credited – India Today

ताहिरा कश्याप –

कॅन्सरशी झुंज देऊन त्यावर मात करणाऱ्यांमध्ये अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचा देखील समावेश आहे. ताहिराने आपल्या या आजारासंबंधी कॅन्सर सर्जरी, बाल्ड लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, मात्र तिने या आजारावर मात केली.

Image Credited – News18

इरफान खान –

बॉलिवूड अभिनेता इरफान खान देखील हा आजार टाळू शकला नाही. इरफानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचे समोर आले होते. यानंतर त्याने लंडनमध्ये उपचार घेतले. आता तो या आजारातून बरा झाला असून, आपला आगामी चित्रपट हिंदी मीडियम 2 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Image Credited – The Indian Express

मनीषा कोइराला –

मनीषा कोइरालाला 2012 मध्ये ओव्हिरियन कॅन्सर असल्याचे समोर आले होते. यानंतर तिने अमेरिकत उपचार घेत या आजारावर मात केली. मनीषाने आपल्या संघर्षाबद्दल ‘Healed: How Cancer Gave Me A New Life’ नावाचे पुस्तक देखील लिहिले.

Leave a Comment