‘शुभ मंगल ज्यादा सावधान’साठी गाणे गाणार आयुष्मान


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट येणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच यामधील ‘गबरू’ गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आयुष्मान या चित्रपटात समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मानला अभिनयासोबतच संगीताचीही आवड असल्यामुळे आता त्याच्या आवाजातील या चित्रपटातही एक गाणे रिलीज केले जाणार आहे.

यापूर्वीही त्याच्या चित्रपटांमध्ये आयुष्मानने गाणी गायली आहेत. त्याने ‘विकी डोनर’, ‘ड्रीमगर्ल’ या चित्रपटात गायलेली गाणी हिट ठरली होती. आता त्याच्या आवाजातील गाणे ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.


इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करुन आयुष्मानने या गाण्याबाबत माहिती दिली आहे. या गाण्याचे बोल ‘मेरे लिये तुम काफी हो’ असे आहेत. एक वेळ अशी होती की माईक समोर उभे राहून गाणे गायचे हे एका स्वप्नाप्रमाणे होते. माझ्या प्रत्येक चित्रपटात आता माझ्या आवाजातील एक गाणे असते. त्याचप्रकारे तुमच्या भेटीला आणखी एक युनिक गाणे येणार, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. २१ फेब्रुवारीला ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment