भारतात दाखल झाली दीड कोटींची ‘ऑडी ए8एल’

लग्झरी कार कंपनी ऑडीने आपली नवीन सेडॉन कार ‘ऑडी ए8एल’ला भारतात लाँच केले आहे. या कारची किंमत 1.56 कोटी रुपये आहे. भारतात याचे केवळ लाँग-व्हिलबेस मॉडेलला बाजारात उतरवण्यात आले आहे.

नवीन ऑडी ए8एलमध्ये 3.0 लीटर टर्बोचार्ज्ड व्ही 6 पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. जे 8 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन 340 एचपी पॉवर आणि 500एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार केवळ 5.7 सेंकदात ताशी 0 ते 100 किमी वेग पकडते.

Image Credited – Navbharattimes

नवीन ऑडी ए8एलचा लूक जुन्या मॉडेलच्या तुलनेत अधिक आकर्षक आहे. कारच्या पुढील बाजूला सिंगल फ्रेम क्रोम ग्रिल, एचडी मॅट्रिक्स स्लीक एलईडी हेडलाईट्स आणि रिअरला ओलेड टेक्नोलॉजीसह बोल्ड टेललॅम्प देण्यात आलेले आहेत.

या कारमध्ये आकर्षक डिझाईन देण्यासाठी अधिकतर फिजिकल बटनांच्या जागी टच बटन देण्यात आलेले आहेत. कारमध्ये नेव्हिगेशन आणि मीडिया कंट्रोलिंगसाठी 10.1 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. क्लायमेट कंट्रोल आणि सीटिंग फंक्शन्ससाठी 8.6 इंच एक कर्व्ड डिस्प्ले देखील मिळेल.

Image Credited – Navbharattimes

कारमध्ये 3डी सराउंड साउंड सिस्टम, आधुनिक वॉइस कमांड फंक्शन, नवीन मल्टी-फंक्शन स्टेअरिंग व्हिल, पर्यायी हेड-अप डिस्प्ले, अँम्बिऐंट लायटिंग आणि सीट मसाज फंक्शन सारख्या सुविधा आहेत. मागील सीठवर बसणाऱ्यांसाठी दो टचस्क्रीनअनेक फीचर्सला ऑपरेट करण्यासाठी रिमोट कंट्रोल आणि फुट मसाजरसोबत फुटरेस्ट सारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

Image Credited – Navbharattimes

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 8 एअरबॅग्स, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, ईएससी, हिल-स्टार्ट असिस्ट आणि 3डी व्हूयसाठी व्ह्यू कॅमेरा सारखे फीचर्स आहेत. ही कार पुर्णपणे इम्पोर्ट करुन भारतात आणण्यात येईल. ग्राहक आपल्या आवडीनुसार कस्टमाइजेशन करू शकतात.

Leave a Comment