समुद्रातून काढलेल्या हजारो टन प्लास्टिकपासून तयार उत्पादनाची विक्री करत आहेत हे युवक

समुद्रात वेगाने वाढणारी प्लास्टिकची समस्या एक मोठे आव्हान ठरत आहे. हे समस्या रोखण्यासाठी अनेक देशातील सरकार अपयशी ठरत आहेत. मात्र दोन युवकांनी या कचऱ्यापासून उत्पादन तयार करण्यासाठी कंपनीची स्थापना केली आहे.

अँड्रूय कूपर आणि एलेक्स सुलेजने तीन वर्षांपुर्वी 4ocean नावाची कंपनी सुरु केली आहे. या कंपनीचा मुख्य उद्देश समुद्रातील प्लास्टिक कचरा काढणे हा आहे. या कंपनीने आतापर्यंत 4 हजार टन प्लास्टिक कचरा समुद्रातून काढला आहे.

Image Credited – Bhaskar

कूपर आणि सुलेजने प्लास्टिक कचऱ्यापासून अनेक उत्पादन बनवून विकत आहेत.  यातील सर्वात लोकप्रिय उत्पादन ब्रेसलेट असून, त्याची किंमत 20 डॉलर आहे. याशिवाय प्लास्टिक रिसायकल करुन पाण्याची बाटली, शॉपिंग बँग्स आणि कपडे देखील बनवले आहेत.

कूपरने सांगितले की, लोकांना जाणीव करुन देण्याची गरज आहे की विकले जाणारे प्रत्येक ब्रेसलेट हे समुद्रातील जवळपास 450 ग्रॅम कचरा कमी करण्याचे काम करत आहे. तुम्ही ब्रेसलेट खरेदी करत नसून, समुद्राला प्लास्टिक संकटापासून वाचवत आहात.

Image Credited – Bhaskar

20 स्थानिक लोक आणि 6 कचरा काढणाऱ्या जहाजांद्वारे ही कंपनी सेंट्रल अमेरिकेच्या किनाऱ्यावरील कचरा काढतात. यासाठी कंपनीने एक खास स्कीमर तयार केला आहे. कंपनी सध्या फ्लोरिडा, बाली, हॅती येथील किनाऱ्यावरील कचरा उचलत आहे.

अँड्रूय कूपर आणि एलेक्स सुलेजने 2017 मध्ये 4ocean ही कंपनी सुरुवात केली आहे. सध्या कंपनीच्या फ्लोरिडा, हॅती, ग्वाटेमाला आणि इंडोनेशिया येथील कार्यालयात 300 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत.

Leave a Comment