कोरोना विषाणू आला विवाह, अंत्यसंस्काराच्या मुळावर


फोटो सौजन्य डेली मेल
कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार आणि फैलाव रोखण्यासाठी चीन मध्ये सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून आता विवाह सोहळे आणि अंतिम संस्कारासाठी गर्दी न जमविण्याचे आदेश चीन सरकारने जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विशेष खास तारखेवर विवाह करण्याची चीन मध्ये क्रेझ आहे. त्यानुसार २ फेब्रुवारी २०२० म्हणजे ०२/०२/२०२० या तारखेला खूप जणांनी विवाह करण्याचे ठरविले होते मात्र कोरोना विषाणू मुळे हुबेई प्रांतांत विवाह नोंदणी होणार नाही तसेच विवाहासाठी कमीत कमी नातेवाईक, मित्र बोलावावेत असेही आदेश दिले गेले आहेत.

चीन मध्ये अंत्यसंस्कार हा एखादा मोठा सोहळा असतो आणि त्यासाठी अनेक जवळचे लोक आवर्जून बोलावले जातात. आता अंत्यसंस्कारात लोकांना बोलावू नये, आवश्यक तेवढेच लोक बोलवावेत असे आदेश दिले गेले आहेत. शिवाय शव पुरण्यास बंदी केली असून प्रेत जाळून टाकावे आणि तेही घरापासून फार दूर न नेता जाळावे असेही आदेश जारी केले गेले आहेत.

शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी केली गेली असून नागरिकांनी परदेशी जाऊ नये तसेच परदेशी नागरिकांनी येथे येऊ नये असेही स्पष्ट केले गेले आहे. या विषाणूने आत्तापर्यंत ४०० हून अधिक बळी घेतले आहेत आणि अजूनही त्याचा प्रकोप वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment