विराटची अनुष्का करणार फास्ट बोलिंग?


फोटो सौजन्य इंडिया डॉट कॉम
बॉलीवूड मध्ये सध्या खेळाडूंच्या भूमिका साकारण्याची चढाओढ सुरु आहे. भारतीय महिला क्रिकेटची कप्तान मिताली राज हिची भूमिका तापसी पन्नू करत आहे तर दुसरीकडे टीम इंडियाचा कप्तान विराटची अभिनेत्री बायको अनुष्का पडद्यावर फास्ट बोलिंग करताना दिसणार आहे असे समजते. होय! अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी कप्तान आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिची भूमिका पडद्यावर साकारणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर झुलन बरोबर अनुष्का नुकतीच चर्चा करताना दिसली तेव्हा ती टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत होती. त्यामुळे या फिल्मची चर्चा सुरु झाली आहे.

अनुष्काने इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडक्शन असो. मध्ये चकदाह एक्सप्रेस या नावाचे टायटल रजिस्टर केले असल्याचेही सांगितले जात आहे. विराट स्वतः उत्तम क्रिकेटपटू आहे त्यामुळे अनुष्का क्रिकेटपटूची भूमिका कशी साकारते हे पाहणे रसिकांना नक्कीच आवडणार आहे.

२०१८ मध्ये झुलनने वनडे क्रिकेट मध्ये २०० विकेट घेतल्या असून हा पराक्रम करणारी ती पहिली महिला क्रिकेटर आहे. लवकरच अनुष्का या चित्रपटाची घोषणा करेल असे मिडिया रिपोर्ट आहेत.

Leave a Comment