या फोटोत दिसतेय हातात हृदय धरलेले टेडी?


फोटो सौजन्य नई दुनिया
सोशल मिडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात हातात हृद्य धरलेले एक टेडी आहे मात्र हा फोटो न्याहाळणाऱ्यातील ७० टक्के लोकांना ते दिसलेले नाही. १४ फेब्रुवारीला जगभर साजऱ्या होणाऱ्या प्रेमाचा उत्सव व्हॅलेंटाइन डे निमित्ताने फेब्रुवारीच्या सुरवातीलाच हा फोटो आला असून ब्रेन टीझर्स युजर्समध्ये तो फारच लोकप्रिय झाला आहे. हॉलिडे होम रेंटल वेबसाईटने मेंदूला कसरत घडविणारा हा फोटो पोस्ट केला असून त्यामुळे युजर्सना त्यात इंटरेस्ट निर्माण झाला आहे.

हा फोटो न्याहाळताना पहिल्याच नजरेत त्यात एक डॉग आहे यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. त्यात हातात हृदय धरलेला टेडी आणखीनच गोंधळ वाढवीत आहे. या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार अनेकांना टेडी दिसला आहे मात्र त्यासाठी सरासरी ३ मिनिटे १६ सेकंद वेळ लागला आहे. हे रेकॉर्ड तोडावे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. त्याचबरोबर या फोटोत क्युपिड टेडीही आहे. ते शोधण्याचे चॅलेंज दिले गेले आहे.

१४ फेब्रुवारी हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन ची आठवण म्हणून साजरा केला जातो आणि त्यापूर्वी ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाईन विक म्हणून साजरा होतो. त्यात दररोज नवीन प्रकारे सेलेब्रेशन केले जाते आणि तरुणाई विशेषत प्रेमात पडलेली किंवा पडण्याच्या तयारीत असलेली तरुणाई मोठ्या प्रमाणावर सामील होते.

Leave a Comment