या गावात शिक्षणामुळे नव्हेतर फुटबॉलमुळे मिळते नोकरी

राजस्थानच्या उदयपूर येथील जावर माइन्स हे गाव ‘फुटबॉल व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात शीख रेजिमेंट जालंधरने एअरफोर्स दिल्लीचा 2-0 असा पराभव केला. जावरमध्ये देशातील सर्वात मोठी झिंक (जस्त) खदाण आहे. मात्र या आदिवासी गावाची ओळख येथील मोहन कुमार मंगलम फुटबॉल स्पर्धेमुळे आहे. ही स्पर्धा येथील गावकारी मागील 42 वर्षांपासून भरवत आहेत. येथे शिक्षणपेक्षा फुटबॉल खेळून अनेकांना नोकरी मिळते.

येथील 170 लोक अशी आहेत, ज्यांनी या फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता व आज सरकारी नोकरी करत आहेत. कोणी शाळेत पीटीआय आहे तर कोणी सब इंस्पेक्टर आहे.

गावकरी सांगतात की, येथे फुटबॉल व्यतरिक्त कोणताही खेळ खेळला जात नाही. घरात लोक फुटबॉलची पुजा करतात.

गावातील या स्पर्धेतून पुढे आलेल्या खेळाडून भारतीय फुटबॉल संघाचे देखील नेतृत्व केलेले आहे. आज गावात एअरफोर्स, रेल्वे, बँक, पोलिसांसह अनेक राज्यातील संघ या स्पर्धेत खेळण्यास येतात.

जावर गावात 200 घरे आहेत. मात्र फुटबॉल सामना बघण्यास आजुबाजूच्या 30 गावातील हजारो लोक जमा होतात. स्टेडियम भरल्यावर लोक डोंगरावर चढून सामन्याचा आनंद घेतात.

Leave a Comment