स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी केलेले उपोषण आणि सत्याग्रह हे मोठे नाटक


बंगळुरू – महात्मा गांधींवर भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंगळुरूत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटक होते, असे वक्तव्य केले. महात्मा अशा लोकांना कसे काय संबोधिले जाते, असा वादग्रस्त सवालही त्यांनी केला.

ब्रिटिशांच्या संमतीने आणि पाठिंब्याने हा संपूर्ण स्वातंत्र्य लढा लढला गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी या तथाकथित नेत्यांना कधीही मारहाण केली नाही. स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक होते. ही खरी लढाई नसून हा जुळवून आणलेला लढा असल्याचे आक्षेपार्ह विधान हेगडे यांनी केले.

महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी केलेले उपोषण आणि सत्याग्रह हेही मोठे नाटकच असल्याचे ते यावेळी म्हणाले. देशाला स्वातंत्र्य गांधींच्या उपोषण आणि सत्याग्रहामुळे मिळाले, असे काँग्रेसला पाठिंबा देणारे लोक मानतात. हे खोटे असून इंग्रजांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिले. मी जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा माझे रक्त खवळते, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment