जोडीदार मिळावा यासाठी या पठ्ठ्याने केली हजारोंची जाहिरात

वेलेंटाइन डे जवळ येत चालला आहे. यामुळे अनेकजण जोडीदाराच्या शोधात आहेत. चांगल्या जोडीदाराच्या शोधासाठी लोक अनेक गोष्टी करतात.  इंग्लंडमधील अशाच एका सिंगल पठ्ठ्याने जोडीदारासाठी चक्के बॅनरच लावला आहे.

या व्यक्तीचे नाव मार्क रोफ आहे. या 30 वर्षीय व्यक्तीने जोडीदाराच्या शोधासाठी थेट बोर्डच लावला. या बॅनरमध्ये मार्क स्वतः आडवा झोपलेला दिसत आहे व त्याच्या खाली लिहिले आहे, सिंगल ? हे ते असू शकते, ज्याची तुम्ही वाट पहात असाल ? हा बॅनर मॅनचेस्टरच्या रस्त्यावर दिसत आहे.

Image Credited – Metro

मार्कने या बॅनरसाठी 425 यूरो (जवळपास 33 हजार रुपये) खर्च केले. यासाठी मार्कने वन मॅन, वन बिलबोर्ड, वन मिशन असे स्लोगन दिले. आतापर्यंत त्याला 300 लोकांनी त्याला डेटसाठी एप्लाय देखील केले आहे.

मार्कने सांगितले की, तो एका उत्तम जोडीदाराच्या शोधात आहे. त्याने अनेक डेटिंग अ‍ॅप देखील ट्राय केले. मित्रांसोबत पबमध्ये बसला असताना त्याला ही बिलबोर्डची कल्पना सुचली.

Leave a Comment