विविध ठिकाणी 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

10वी पास असणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी नोकरीची संधी आहे. हिंदूस्तान कॉपर लिमिटेड, रेल्वे व्हिल फॅक्ट्री, एसबीआयमध्ये अनेक पदांसाठी भरती आहे. याविषयी जाणून घेऊया.

हिंदूस्तान कॉपर लिमिटेड –

हिंदूस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत 161 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक अशा अनेक पदांसाठी भरती आहे. इच्छुक उमेदवार 10वी पास असणे गरजेचे आहे. सोबतच त्याच्याकडे ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असून, उमेदवारांना 10वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार  हिंदूस्तान कॉपर लिमिटेडची अधिकृत वेबसाईट hindustancopper.com ला भेट देऊ शकतात.

रेल्वे –

रेल्वे व्हिल फॅक्ट्रीमध्ये नोकरीची खास संधी आहे. स्पोर्ट्स कोटाद्वारे विविध पदांसाठी नोकर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवाराचे वय हे किमान 18 आणि कमाल 25 वर्ष असणे गरजेचे आहे. सामान्य वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 500 रुपये आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 250 रुपये आहे. इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारीपर्यंत ऑफलाइन अर्ज भरू शकतात. अधिक माहितीसाठी indianrailways.gov.in वेबसाईटला भेट द्या.

स्टेट बँक ऑफ इंडिया –

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज करणाऱ्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी असून, सामान्य वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 750 रुपये आणि एससी/एसटी उमेदवारांना यात सुट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in भेट देऊ शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला कमीत कमी 30 हजार रुपये वेतन मिळेल.

एनआयटी आगरतळा –

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आगरतळाने विविध विभागाच्या असिस्टंट प्रोफेसर (ग्रेड 1 आणि 2) पदांकरिता अर्ज मागवले आहेत. यातील 2 पदे बायो- इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग 1, सिव्हिल इंजिनिअरिंग 8, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग 9, कॉम्प्यूटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग 8, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअरिंग 6 आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी 4 पदांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी http://hr.nita.ac.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.

इंडियन बँक –

इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी असून, मार्चमध्ये परिक्षा होईल. सामान्य वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 600 रुपये आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 100 रुपये आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://www.indianbank.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.