रेनॉल्ट सादर करणार आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक कार

रेनॉल्ट इंडिया लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. ही एक एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार असेल. कंपनीने अधिकृतरित्या याचे टिझर जारी केले आहे. ही इलेक्ट्रिक कार एक एंट्री लेव्हल हॅटबॅक क्विडवर बेस्ड असेल.

कंपनी ही कार रेनॉल्ट सिटी के – झेडई नावाने लाँच करू शकते. या झिरो एमिशन गाडीला मागील वर्षी सप्टेंबरमध्ये चीनच्या चेंगडू मोटर शोमध्ये सादर करण्यात आले होते.

Image Credited – Amarujala

रेनॉल्ट आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक कार ऑटो एक्स्पो 2020 मध्ये 5 फेब्रुवारीला सादर करू शकते. रेनो के-झेडईचे डिझाईन क्विडशी मिळते जुळते आहे.

रेनॉल्टने या कारला डाँगफेंग मोटर्ससोबत मिळून तयार केले आहे. रेनॉल्ट सिटी के-झेडई मध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतील. यात स्टायलिंग ग्रिलसोबत एलईडी हेडलॅम्प्स मिळतील. टेल लॅम्प्समध्ये देखील एलईडी सेटअप पहायला मिळेल. कंपनी यात फास्ट चार्जिंगचे फीचर देईल. सिंगल चार्जिंगमध्ये ही कार 271 किमी अंतर पार करु शकते.

Image Credited – Amarujala

या कारमध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा, टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, रिअर एसी वेंट्स, ऑटोमेटिक एसी इत्यादी प्रिमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये बंपर देखील नवीन असेल व बॉडी डिझाईन रेग्युलर क्विडपेक्षा वेगळे असेल. चीनमध्ये या कारची किंमत 61,800 युआन (6.36 लाख रुपये) ते 71,800 युआन (7.40 लाख रुपये) आहे.

Leave a Comment