रेल्वेच्या या मॉर्डन टॉयलेटमुळे वर्षाला होणार लाखो लीटर पाण्याची बचत

मुंबईमधील मरीन लाइन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मॉर्डन टॉयलेट (शौचालय) बनविण्यात आले आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की यामुळे वर्षाला 3-4 लाख लीटर पाण्याची बचत होईल.

मरीन लाइन रेल्वे स्टेशनवरून दररोज लाखो लोक प्रवास करतात. यामुळे टॉयलेटचा उपयोग देखील भरपूर होतो. यासाठीच हे मॉर्डन टॉयलेट तयार करण्यात आले आहे. यामध्ये विशेष नळ बसवण्यात आले असून, हे नळ फवाऱ्याप्रमाणे पाणी सोडतात. यातून पाणी कमी मात्रेत येते.  जेणेकरुन पाण्याची बचत होते.

रेल्वेने अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबत माहिती दिली.

Posted by North Western Railway on Saturday, February 1, 2020

टॉयलेटचे इंटेरिअर वुडन कॉन्सेप्टवर आधारित आहे. टॉयलेटच्या छताला मंगलुरु स्टाइल कॅनोपी आकार देण्यात आलेला आहे. यामुळे पाणी साचत नाही.

Leave a Comment