नितेश तिवारी अन् अश्विनी अय्यर तिवारी करणार ‘सियाचीन वॉरिअर्स’ची निर्मिती


बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर आजकाल बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार होत असून बायोपिक, क्रीडा, सामाजिक विषय यांसारख्या आशयांवर यामध्ये अधिक भर दिला जात आहे. आजवर आपल्याला भारतीय सैन्यावर आधारितही बरेच चित्रपट पाहायला मिळाले. पण, पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला सियाचीन येथील सैनिकांवर आधारित चित्रपट येणार आहे. दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आणि ‘पंगा’च्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकत्र आले आहेत.


अश्विनी अय्यर या नितेश तिवारी यांच्या पत्नी असून नुकताच त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘पंगा’ चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट महिला कबड्डी खेळाडूवर आधारित होता. नितेश आणि अश्विनी अय्यर तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच सुधा आणि नारायण मुर्ती यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करत असल्याची घोषणा केली. आता ‘सियाचीन वॉरिअर्स’ या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत.

ते या चित्रपटाची महावीर जैन यांच्यासोबत मिळून निर्मिती करणार आहेत. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय शेखर शेट्टी हे करणार आहेत. या चित्रपटाची कथा पियुष गुप्ता आणि गौतम वैद यांनी लिहिली आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave a Comment