जाणून घ्या कोरोना व्हायरसची सुरुवात झालेल्या शहराविषयी

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान शहरापासून झाली. चीनच्या बीजिंग आणि शंघाई या शहराप्रमाणे वुहान शहर प्रसिद्ध नसले तरी हे असे एक महानगर आहे, जे जगभरातील सर्व भागांशी जोडलेले आहे.

सरकारी आकड्यांनुसार या शहराची लोकसंख्या 1 कोटी 10 लाख आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार वर्ष 2018 मध्ये या शहराची लोकसंख्या 89 लाख होती.

Image Credited – Amarujala

हे शहर आकारात लंडन एवढे आहे आणि वॉशिंग्टन डीसीपेक्षा अधिक मोठे आहे. एका अंदाजानुसार, वुहान जगातील 42वे आणि चीनचे सातवे सर्वात मोठे शहर आहे. वुहानचा आकार आणि याच्या आर्थिक स्थानावरुनच कोरोना व्हायरस आशियामध्ये वेगाने कसा पसरला याचा अंदाज बांधता येतो. थोडक्यात जगभरातील लोक या शहरात येतात व जाताना कोरोना व्हायरसचा संसर्ग आपल्या सोबत घेऊन मायदेशात जात आहेत.

Image Credited – Amarujala

वर्ष 2016 मध्ये वुहान आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 2 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. येथून लंडन, पॅरिस, दुबई आणि दुबई आणि जगातील मोठमोठ्या शहरांमध्ये थेट उड्डान घेता येते.

Image Credited – Amarujala

यांग्त्जी नदीवर वसलेल्या या शहरात हायटेक मॅन्यूफेक्चरिंगसह पारंपारिक गोष्टीची निर्मिती देखील होते. येथे अनेक औद्योगिक क्षेत्र आहेत. उच्च शिक्षणासाठी 52 संस्था आहेत. दावा करण्यात येतो की, चीनमध्ये सर्वाधिक अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी याच शहरात शिकतात. जगातील 500 मोठ्या कंपन्यांनी पैकी 230 कंपन्यांनी वुहान शहरात गुंतवणूक केलेली आहे. वुहानमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये फ्रान्स प्रमुख आहे.

Image Credited – Amarujala

1886 ते 1943 पर्यंत वुहानला हांकोउ नावाने ओळखले जात असे, तेव्हा फ्रान्सला येथे विशेष सवलत होती. फ्रान्सच्या 100 कंपन्यांनी वुहानमध्ये गुंतवणूक केली असून, यातील अनेक ज्वाइंट वेंचर्स आहेत.

येथे जगभरातून पर्यटक येत असतात. भलेही कोरोना व्हायरस या शहरातील स्थानिक सीफूड मार्केटमधून पसरला असेल. मात्र येथे येणाऱ्या लोकांनी नकळत हा व्हायरस पसरवला. अमेरिका, जापान, थायलंड या देशातील नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्या सर्वांनी चीनचा प्रवास केला होता.

Leave a Comment