या अ‍ॅप्सद्वारे मिळेल तुमच्या आजुबाजूच्या मोफत वाय-फायची माहिती

सध्या इंटरनेट वापराचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेट पॅकच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. मात्र असे असले तरी अनेकजण मोफत इंटरनेट वापरण्याच्या पद्धती शोधत असतात. विमानतळ आणि रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी तर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध असते. मात्र अनेकदा अशा ठिकाणी जाते जेथे नेटवर्क कमी होते व इंटरनेट स्पीड देखील कमी असतो. अशावेळी वाय-फायची गरज भासू शकते. आज अशाच काही अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही मोफत वाय-फायचा वापर करु शकाल.

Image Credited – Instabridge

इंस्टाब्रिज –

इंस्टाब्रिज असेच एक अ‍ॅप आहे, ज्याद्वारे तुम्ही सार्वजनिक वाय-फायशी जोडले जाऊ शकता. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे हे तुमच्या डिव्हाईसला सर्वाधिक फास्ट नेटवर्कशी कनेक्ट करते. याशिवाय नेटवर्क नसल्यास हे अ‍ॅप ऑटो मोबाईल नेटवर्कवर येते, जेणेकरून कनेक्टिव्हिटी कायम राहिल.

Image Credited – Indiatvnews

फेसबुक –

तुम्ही फेसबुक अ‍ॅपने देखील मोफत वाय-फायचा शोध घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फेसबुक अ‍ॅपच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर खालच्या बाजूला फाइंड वाय-फाय पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला उपलब्ध असलेले मोफत वाय-फाय दिसतील.

Image Credited – Amarujala

वेफी (WeFi) –

वेफी अ‍ॅपद्वारे तुमच्या आजुबाजूच्या मोफत वाय-फायबद्दल माहिती मिळू शकेल. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप जर तुमच्या फोनमध्ये असेल तर ते डिव्हाईसला आपोआप मोफत वाय-फायशी कनेक्ट करेल. हे अ‍ॅप प्ले स्टोरवरुन मोफत डाउनलोड करता येईल.

Image Credited – Cnet

गुगल असिस्टंट –

तुम्ही सामान्य इंटरनेट स्पीडच्या मदतीने देखील गुगल असिस्टंटद्वारे मोफत वाय-फायचा शोध घेऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ ‘फ्री वाय-फाय निअर मी’ असे सर्च करावे लागेल. यानंतर तुम्हाला आपल्या आजुबाजूचे सर्व मोफत वाय-फाय कनेक्शनबद्दल माहिती मिळेल.

Leave a Comment