हा अब्जाधीश वर्षाला भरणार विद्यार्थ्यांची 100 कोटी रुपये फी

हाँगकाँगमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ली का शिंग यांनी चीनी विद्यापीठ शैंतो यूनिवर्सिटीमधील कॉलेज विद्यार्थ्यांची ट्यूशन फी 5 वर्षांपर्यंत भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते वर्षाला 1.44 कोटी डॉलर ( जवळपास 100 कोटी रुपये) खर्च करणार आहेत. ली यांना सुपरमॅन देखील म्हटले जाते. फोर्ब्सनुसार, ते हाँगकाँगचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

एका मुलाखतीमध्ये 90 वर्षीय ली यांनी सांगितले की, त्यांची संस्था एका विशिष्ट वर्गाच्या पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची  ट्यूशन फी भरणार आहे. असे केल्याने त्या विद्यार्थ्यांच्या कुटंबावरील आर्थिक ओझे कमी होईल व त्यांचे अभ्यासात मन लागेल, असे ली यांना वाटते.

ली यांची संपत्ती 3 हजार कोटींपेक्षा आहे. त्यांचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी ते 1940 मध्ये हाँगकाँगमध्ये स्थायिक झाले. एका कारखान्यात काम करण्यापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी बंदराचे संचालक आणि सेल फोन वाहक सीके हचिसन होल्डिंग्समध्ये एक रिअल एस्टेट डेव्हलपर आणि प्रमुख गंतवणूकदार म्हणून स्वतःला स्थापन केले.

ली का-शिंग फाउंडेशन आरोग्यासंबंधित विविध संघटना आणि चीनमध्ये शिक्षणसाठी 3.2 अब्ज डॉलर दान करण्यासाठी देखील ओळखले जाते.

Leave a Comment