आता अभिनय क्षेत्रात हात आजमावणार हरभजन सिंह


आपल्या नव्या भूमिकेसाठी भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह सज्ज झाला असून हरभजनला गेली अनेक वर्ष भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरी, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आहे. अशातच चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न हरभजन सिंहने केला आहे. ‘फ्रेंडशिप’ या तामिळ चित्रपटात प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत हरभजन असणार आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर खुद्द हरभजनने शेअर केले आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सूर्या यांनी केले आहे. चित्रपटाची कथा ही दंगलीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे पोस्टर पाहिल्यानंतर दिसून येते. हा चित्रपट तामिळ सोबत आणखी ४ भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हरभजन सिंहने याआधी टिव्हीवर अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपली हजेरी लावली असल्यामुळे त्याला या नवीन भूमिकेत चाहते स्विकारतात का हे आगामी काळाच सांगेल.

Leave a Comment