दावा ; एचआयव्हीच्या औषधांद्वारे कोरोना व्हायरसचा उपचार शक्य

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 17 हजारांपेक्षा अधिक लोकांना ग्रासले आहेत. यातील 95 टक्के संख्या ही चीनमधील आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 350 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. थायलंडच्या डॉक्टरांना या आजारावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. थायलंडच्या सरकारने देखील हे औषध फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. हे औषध दिल्यानंतर रुग्ण 48 तासात बरा होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.

थायलंडचे डॉक्टर क्रिएनसाक अतिपॉर्नवानिच यांनी सांगितले की, आम्ही 71 वर्षीय महिला रुग्णाला हे नवीन औषध देऊन 48 तासात ठीक केले. औषध दिल्यानंतर महिला 12 तासानंतर बेडवरुन उठून बसू लागली, त्याआधी ती हलू देखील शकत नव्हत्या. 48 तासानंतर महिलेची तब्येत 90 टक्के व्यवस्थित झाली होती. काही दिवसात आम्ही महिलेला अगदी व्यवस्थित करुन घरी पाठवू.

डॉक्टरांनुसार, लॅबमध्ये या औषधाचे परिक्षण केल्यांनतर त्याचे रिझल्ट सकारात्मक मिळाले. याद्वारे 12 रुग्णांवर त्वरित परिणाम झाला. 48 तासात रुग्ण अगदी व्यवस्थित झाले.

डॉक्टरांनी दावा केला की, या व्हायरसच्या उपचारासाठी एंटी-फ्लू ड्रग ओसेल्टामिव्हिरला लोपिनाविर आणि रिटोनाविरसोबत मिसळून नवीन औषध तयार केले. यावर लॅबमध्ये परिक्षण सुरु आहे. कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी एंटी-फ्लू ड्रग ओसेल्टामिव्हिर औषधाचा वापर एचआयव्हीच्या उपचारात वापण्यात येणाऱ्या पिनाविर आणि रिटोनाविरसोबत मिसळून नवीन औषध तयार केले.

थायलंडमध्ये आतापर्यंत 19 जणांना हा आजार झाला आहे. यातील 8 जणांना 14 दिवसात बरे करुन घरी पाठवण्यात आले. 11 जणांवर उपचार सुरु आहे.

थायलंडच्या सरकारने या औषधाला अधिक चांगले बनविण्यासाठी केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवले आहे. प्रयोगशाळेत या औषधावर यशस्वी परिक्षण झाले तर हे कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेले पहिले यशस्वी औषध ठरेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment