या 5 पद्धतींद्वारे हॅकर्स करतात तुमचे खाते रिकामे

इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, अनेकजण पैशांचे व्यवहार देखील ऑनलाईन करतात. मात्र यासोबतच ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. हॅकर्स तुमची माहिती चोरून सहज तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतात. अशाच काही पद्धतींविषयी जाणून घेऊया, ज्याद्वारे हॅकर्स तुमची माहिती सहज चोरतात व तुमचे आर्थिक नुकसान होते.

Image Credited – Ars Technica

स्मिशिंग –

हॅकर्स या पद्धतीद्वारे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना निशाणा बनवतात. हॅकर्स ग्राहकांना कॅशबॅक अथवा बंपर डिस्काउंटची ऑफर देतात. यामुळे तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते. या माहितीद्वारे हॅकर्स तुमचे खाते रिकामे करतात.

Image Credited – The Economic Times

ज्यूस जॅकिंग –

या पद्धतीद्वारे हॅकर्स सार्वजनिक चार्जिंग पोर्टवर फाइल अथवा कार्ड रिडर चीप लावतात. ही चीप चार्जिंग पोर्टवर लावलेल्या स्मार्टफोनमधील सर्व माहिती कॉपी करुन घेते आणि फोनमध्ये व्हायरस टाकते.

Image Credited – nypost

रिमोट असिस्टंट –

यामध्ये हॅकर्स लोकांना क्विक स्पोर्ट आणि एनीडेस्क सारखे अ‍ॅप्स डाउनलोड करायला सांगतात. हे अ‍ॅप्स हॅकर्सला तुमच्या फोनचा संपुर्ण एक्सेस देतात. याद्वारे तुमची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते व हॅकर्स तुमचा फोन कंट्रोल करतात.

Image Credited – TechRepublic

फिशिंग –

यामध्ये हॅकर्स लोकांना व्हायरस असणारे लिंक आणि एसएमएस पाठवतात. यावर क्लिक केल्यानंतर तुमची संपुर्ण माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते. हॅकर्सला खाजगी माहिती दिल्याने, तुमच्या खात्यातून रक्कम काढली जाते.

Image Credited – medium

ऑनलाईन व्यवहार –

या पद्धतीमध्ये हॅकर्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन कॉल केल्याचा दावा करतातत. यानंतर ग्राहकांना रिफंडचे आमिष दाखवून खाजगी माहिती मिळवतात. माहिती मिळताच हॅकर्स काही मिनिटात खाते रिकामे करतात.

Leave a Comment