मोबाईलच्या बॅटरीसंबंधी पसरलेल्या या मिथकांबद्दल जाणून घ्या सत्य

जगभरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सोबतच हे डिव्हाईसचा वापर आणि मेंटेनेंसच्या पद्धतीमध्ये देखील वाढ झाली आहे. फोनसाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे बॅटरी. बॅटरीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. फोनच्या बॅटरीबद्दल अनेक असत्य गोष्टी पसरलेल्या आहेत, ज्यावर लोक सहज विश्वास ठेवतात.

ओव्हर चार्जिंग –

सर्वसाधारणपणे फोनला ओव्हर चार्जिंग केल्याने बॅटरीचे नुकसान होते. ओव्हर चार्जिंगमुळे फोनची बॅटरी ब्लास्ट देखील होऊ शकते, , असे म्हटले जाते. मात्र तज्ञांचे म्हणणे आहे की, फोनच्या बॅटरीमध्ये अशी सिस्टम दिली जाते, ज्याद्वारे फोन फुल चार्ज झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटीला आपोआप डिस्कनेक्ट करतो. या सिस्टममुळे फोनच्या बॅटरीला काहीही नुकसान होत नाही.

Image Credited – Amarujala

पुर्ण बॅटरी संपल्यावर चार्जिंग –

स्मार्टफोनची बॅटरी संपुर्ण संपल्यावर चार्जिंग करावी, असे काहीजण सांगतात. मात्र तज्ञांनुसार, असे केल्याने फोनच्या बॅटरीला नुकसान होऊ शकते. डिस्चार्ज झाल्याने बॅटरीमध्ये रासायनिक प्रतिक्रिया होते, ज्यामुळे बॅटरी बॅकअप कमी होतो. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी टेक कंपन्या फोनमध्ये बॅटरी मॅनेजमेंट फीचर देतात. जे अ‍ॅप्सला ऑप्टिमाइज करून बॅटरी लेव्हलला शून्य होऊ देत नाही.

Image Credited – Amarujala

फोनची बॅटरी फ्रिजरमध्ये ठेवल्याने बॅकअप मिळतो –

अनेकजण फोन गरम झाल्यानंतर बॅटरी काढतात व फ्रिजरमध्ये ठेवतात. मात्र असे केल्याने बॅटरीला नुकसान होऊ शकते व बॅटरी बॅकअपमध्ये देखील सुधारण होत नाही. बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी फोनमधील फीचर्सचा वापर करावा. गरजेचे नसलेले अ‍ॅप्स डिलीट करावे.

Image Credited – Teller Report

सार्वजनिक पोर्टने चार्जिंग –

विमानतळ अथवा रेल्वे स्टेशनवर लावलेल्या चार्जिंग पोर्टद्वारे फोन चार्ज करणे सुरक्षित असल्याचे काहीजण म्हणतात. मात्र असे करणे सुरक्षित नाही. कारण यामुळे तुमचा खाजगी डेटा लीक होऊ शकतो. हॅकर्स या प्रकारच्या चार्जिंग पोर्टवर रीडर पोर्ट लावतात. ज्यामुळे खाजगी माहिती लीक होते. सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करण्याऐवजी पॉवरबँकचा वापर करावा.

Image Credited – Rd.com

दुसऱ्या चार्जरमुळे बॅटरी नुकसान –

अनेकांना वाटते की, फोनला त्याच्या ओरिजनल चार्जरपासून चार्ज करावे, जेणेकरून बॅटरीला नुकसान पोहचत नाही. सोबतच यामुळे बॅटरी बॅकअप देखील कमी होतो. मात्र तज्ञांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या केबल अथवा चार्जरने चार्जिंग केल्यास बॅटरीला काहीही नुकसान होत नाही. मात्र फोनचा चार्जिंग स्पीड कमी होतो.

Leave a Comment