कोरोना : चीनने 10 दिवसात उभारले 1 हजार बेडचे हॉस्पिटल

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने हुबई प्रांतातील वुहान शहरात 10 दिवसात 1000 बेड असणारे हॉस्पिटल उभारले आहे. रविवारी विक्रमी वेळेत या हॉस्पिटलचे काम पुर्ण झाले. कोरोना व्हायरसच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत आहे. जवळपास 2 लाख 69 हजार वर्ग फूटात हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

वुहान प्रशासनाने या हॉस्पिटलचे काम 24 जानेवारीला सुरू केले होते. कारण या व्हायरसचा परिणाम याच शहरातील नागरिकांवर सर्वाधिक झाला आहे. या हॉस्पिटलच्या लवकरात लवकर निर्मितीसाठी संपुर्ण देशातून इंजिनिअर्सला बोलवण्यात आले होते. येथे उपचारासाठीच्या सर्व आधुनिक सुविधा आणि उपकरण देखील आहेत. काही उपकरण हॉस्पिटलमध्ये इंस्टॉल करण्यात आली असून, काही बाहेरून मागवण्यात आली आहेत. यासाठी कंपन्या आणि दुसऱ्या शहरातील हॉस्पिटलशी संपर्क साधला जात आहे.

या हॉस्पिटलचे नियंत्रण चीनच्या सैन्याकडे आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवळपास 1400 मिलिट्री मेडिकोजला येथे बोलवण्यात आले आहेत. वुहानमध्ये जवळपास 1 कोटींपेक्षा अधिक लोक आपल्या घरात बंद असून, देशभरात आतापर्यंत 14 हजार असे प्रकरण समोर आली आहेत. तर आतापर्यंत 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

2002-03 मध्ये अशाच प्रकारे सार्स व्हायरसमुळे चीन आणि हाँगकाँगमध्ये 650 लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा बिजिंगमध्ये 7 दिवसात 6 एकर जागेत अस्थायी आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते.

Leave a Comment