यंदाचे वर्ष ३६६ दिवसांचे


फोटो सौजन्य नई दुनिया
यंदाचे नवे वर्ष म्हणजे २०२० हे लीप ईअर असून या वर्षात ३६५ ऐवजी ३६६ दिवस असणार आहेत. त्यामुळे या फेब्रुवारीत २८ ऐवजी २९ तारखा असतील. दर चार वर्षांनी लीप ईअर येते आणि विशेष म्हणजे त्यात बाकी महिन्यांच्या दिवसात काही फरक नसतो पण फेब्रुवारीत २९ दिवस असतात. याचा संबंध पृथ्वीच्या सूर्य प्रदक्षणेच्या कालावधीशी आहे. पृथ्वीला एक सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस आणि ६ तास लागतात. हा सहा तासाचा जादा वेळ म्हणजे चार वर्षातून एकदा एक दिवसाचा वेळ इतका होतो. त्यामुळे दर चार वर्षांनी ३६६ दिवसांचे वर्ष मोजले जाते.

लीप इअर ठरविण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या वर्षाला चार या संखेने भाग जायला हवा. ज्यांचा जन्म २९ फेब्रुवारीला होतो त्यांचा वाढदिवस चार वर्षातून एकदा येतो. अर्थात सोयीसाठी त्यांचा जन्मदिवस २८ फेब्रुवारीला केला जात असला तरी जन्मतारखेची नोंद मात्र २९ फेब्रुवारी अशीच होते.


भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म लीप ईअर् मधला म्हणजे २९ फेब्रुवारी १८९६ सालचा होता. आणि ते भारताचे चौथे पंतप्रधान होते. सुपरमॅन कॉमिक्स लीप ईअर मध्येच प्रकाशित झाले होते त्यामुळे त्याचा लेखक जॅरी सीगल सुपरमॅनचा जन्म लीप ईअर् मधला असल्याचे मानत असे. प्रसिद्ध नृत्यांगना रुक्मिणी देवी यांचा जन्म २९/२/१९०४ चा होता आणि त्या भारताच्या राज्यसभेवर पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडल्या गेल्या होत्या.

भारतीय कालगणना वेगळी असून आपल्या कालगणनेत लीप इअर येत नाही मात्र दर ३ वर्षांनी अधिक मास येतो. चीन मध्येही दर ३ वर्षांनी वर्षात एक महिना अधिक येतो.

Leave a Comment