भारतीय ऑलिम्पिक संघाची गांगुलीला सदिच्छा दूत बनण्याची विनंती


फोटो सौजन्य द फेडरल
भारतीय ऑलिम्पिक संघाने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना टोक्यो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनावे अशी विनंती करणारे पत्र पाठविले आहे. ऑलिम्पिक संघाचे महासचिव राजीव मेहता या संदर्भात माहिती देताना म्हणाले यंदा टोक्यो ऑलिम्पिक साठी विविध क्रीडाप्रकारात सहभागी होण्यासाठी २०० भारतीय खेळाडू जात आहेत आणि यंदाचे ऑलिम्पिक भारतासाठी विशेष आहे कारण ऑलिम्पिक सहभागाचे भारताचे हे शताब्दी वर्ष आहे.

भारतीय ऑलिम्पिक खेळाडू पथकात वरिष्ठ खेळाडू आहेत तसेच प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे युवा खेळाडूही आहेत. संघाने गांगुली याना लिहिलेल्या पत्रात गांगुली युवा खेळाडूंचे रोल मॉडेल आहे, त्यांनी खेळ प्रशासक म्हणून नेहमीच युवा टॅलंटचा शोध घेतला आहे. त्यामुळे भारतीय दलाचे ते सदिच्छा दूत बनले तर खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, त्यांचा उत्साह वाढेल म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी असे लिहिले आहे.

चार वर्षापूर्वी रिओ ऑलिम्पिक साठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, बॉलीवूड हिरो सलमान खान आणि संगीतकार ए.आर. रेहमान यांनी सदिच्छा दूत म्हणून जबाबदारी पार पाडली होती. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० या काळात होत आहेत.

Leave a Comment