ह्युंदाई दर ३३ सेकंदाला बनविते एक कार


फोटो सौजन्य पत्रिका
ह्युंदाई मोटर्स सर्वाधिक म्हणजे ३० लाख कार्स निर्यात करणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. औरा ही नुकतीच लाँच झालेली कंपनीची कार निर्यात होत असून श्रीपेराम्बदूर उत्पादन प्रकल्पात या कारचे उत्पादन केले जात आहे. ह्युंदाईने १९९९ पासून कार निर्यातीची सुरवात केली असून सर्वप्रथम २० युनिट नेपाळ मध्ये निर्यात केली गेली होती.

२००४ पर्यंत कंपनीने १ लाख कार निर्यातीचा टप्पा गाठला होता तर ही संख्या मार्च २००८ मध्ये ५ लाख तर २०१० मध्ये १० लाख आणि २०१४ मध्ये २० लाख कार्स वर होती. सध्या कंपनी १० मॉडेल्स ८८ देशात निर्यात करत आहे. त्यात आशिया, लॅटीन अमेरिका, आफ्रिका, युरोप यांचा समावेश असून या भागात सँट्रो, ग्रँड आय१०, एक्सेंट, ग्रँड आय१० नियोस, ऑरा, आय२०, वेरना, वेन्यू, क्रेटा या मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात दर ३३ सेकंदाला एक कार असेम्बल केली जाते. क्रेटा, वेरना, याना सौदी बाजारात विशेष पसंती आहे तर ह्युंदाईच्या कार्स लिबिया आणि आफ्रिकेत सुद्धा लोकप्रिय आहेत असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment