स्वस्त आयफोन येतोय


फोटो सौजन्य जागरण
देशातील अनेक मोबाईल युजरसाठी महाग किमतीमुळे आयफोन हे स्वप्न राहिले असले तरी त्यांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ नजीक आली आहे. सर्वात महाग फोन विकणाऱ्या अॅपलने फेब्रुवारीत स्वस्तातील आयफोनचे ट्रायल प्रोडक्शन सुरु केले असून माय ड्रायव्हर्सच्या रिपोर्ट नुसार हे स्वस्त आयफोन मार्च अखेरी लाँच केले जातील. हे फोन आयफोन ९ किंवा आयफोन एसई टू नावाने स्पेशल एडिशन अफोर्डेबल रेंज खाली लाँच केले जातील. हे फोन भारतात ३० हजार रुपयांपेक्षा स्वस्त मिळतील असेही सांगितले जात आहे.

भारतात चीनी मोबाईल कंपन्यांनी बाजारावर वर्चस्व मिळविले आहे. नवे अफोर्डेबल आयफोन या फोन्सपेक्षा स्वस्त मिळतील. मिडिया रिपोर्टनुसार नवीन स्वस्त आयफोनला ५.४ इंची डिस्प्ले, टच आयडी होम बटण सह दिला जाईल. तसेच त्यासाठी ए १३ चीप, ३ जीबी रॅम असेल. या फोन संदर्भात अनेक लिक्स आले आहेत. अॅपल ने आयफोन एट नंतर आयफोन सिरीज मधले आयफोन १० आणि आयफोन ११ सादर केले आहेत. मात्र आयफोन नाईन सादर केलेला नाही त्यामुळे हा स्वस्त फोन आयफोन नाईन नावाने बाजारात आणला जाईल असे सांगितले जात आहे.

भारतासारख्या विकसनशील देशातील बाजारात अॅपलला त्याच्या महाग हँडसेटस मुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याविरोधात चीनी कंपन्या स्वस्तातील हँडसेट्स विकून भारी भक्कम फायदा मिळवत आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी बाजारावर चांगली पकड बसविली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अॅपल स्वस्त आयफोन सादर करत असून आयफोन १२ सिरीज याच वर्षात लाँच केली जाणार आहे असे समजते.

Leave a Comment