जगातील या सर्वात वजनदार पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी लागतात सहा लोक


सिनपेत्री- उत्तर हंगेरीतील गाव सिनपेत्रीचा नागरिक असलेल्या 71 वर्षीय बेला वर्गाने एक पुस्तक बनवले असून या पुस्तकाचे असे वैशिष्टेय आहे की हे जगातील सर्वात मोठे पुस्तक आहे. असा दावा बेला यांनी केला आहे. त्यांनी हे पुस्तक बनवण्यासाठी पारंपरिक बुक बाइंडिंग पद्धतीचा वापर केला असून 346 पाने 4.18 मीटर लांब आणि 3.77 मीटर रुंद पुस्तकात आहेत. 1420 किलोग्राम या पुस्तकाचे वजन आहे. परिसरातील वातावरण, गुफा आणि भूभागांची माहिती या पुस्तकात आहे

बेला यांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार फक्त याच्या आकारामुळेच नाही तर हे पुस्तक याला बनवण्याच्या पद्धतीमुळेही चर्चेत आले आहे. हे पुस्तक परिसराची माहिती देणाऱ्या पुस्तकांपेक्षा वेगळी आहे. लाकडाचा टेबल आणि अर्जेटीनावरुन मागवलेल्या चामड्याचा वापर यासाठी झाला आहे. या पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी तब्बल 6 लोकांची मदत घ्यावी लागते. हे पान एक मशीन आणि स्कूजच्या मदतीने उलटले जाते. दरम्यान पुस्तकाची एक लहानशी कॉपीदेखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव दाखल करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याचे वजन 11 किलोग्राम आहे. दोन्ही पुस्तकांना सोबतच तयार करण्यात आले आहे.

Leave a Comment