पेनाच्या टोपणाला का असते एक छोटे छिद्र?


आपल्यापैकी जवळपास प्रत्येकजण नियमित पेन एक अशी वस्तु आहे ज्याचा वापर करतो. पेनाचा वापर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण करतात. पण एक लहानसे छिद्र याच पेनाच्या टोपणाला (होल) असते. पण पेनाच्या टोपणाला हे छिद्र का असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

आपल्या वडीधा-यांना किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांना लहानपणी पेन वापरताना पाहिले आहे. आपणही यानंतर बॉलपेनचा वापर करण्यास सुरुवात केली आणि आपण या पेनचा वापर करत मोठेही झालो. पण पेनाला लहान छिद्र का असते हे आपल्यापैकी कदाचित काही लोकांनाच माहित असेल.

काही लोकांच्या मते पेन बंद स्थितीत असताना या छिद्रांमुळे हवेचा बाहेरील दाब व शाईवरील दाब यांमध्ये समतोल राखला जातो. उन्हाळ्यात वा बंदिस्त जागी पेन टोपणाला छिद्रे नसल्यास ठेवले असता तापमान वाढून टोपणात शाई उतरते. पण या छिद्रामागचे खरे कारण काही वेगळेच आहे. तुम्ही आता विचार करत असाल की नेमके काय कारण आहे?

अनेकांना पेनाचे टोपण तोंडात टाकण्याची सवय असते, लहान मुलांना खासकरुन. एखाद्याने जर चुकून तोंडात टोपण टाकले आणि ते गिळले तर अडचण निर्माण होवू शकते. पेनाच्या टोपणाला जर छिद्र नसेल तर हवा पास होणार नाही आणि त्यामुळे मोठा घात होण्याची शक्यता असते. म्हणूनच पेनाच्या टोपणाला लहान छिद्र देण्याचा निर्णय घेतला जेणेकरुन त्याद्वारे हवा पास होईल.

Leave a Comment